देश

“नरेंद्र मोदींच्या अपयशाच्या बातम्या चीनमध्येही छापून येतात”

अमरावती | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपयशाच्या बातम्या चीनमध्येही छापून येतात, असं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. त्यांनी चीन मधील ‘चीन ग्लोबल टाईम्स’ या वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा उल्लेख केला आहे.

1 फेब्रुवारी हा आंध्र प्रदेशसाठी काळा दिवस असून संसदेत अर्थसंकल्प सादर होत असताना शांततेच्या मार्गानं आपला विरोध नोंदवावा, असं त्यांनी तेलगू देसम पार्टीच्या नेत्यांना सांगितलं आहे.

केंद्र सरकारनं गेल्या चार अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशची फसवणूक केली असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या कारभारामुळं देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं देखील चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले

काँग्रेस, राष्ट्रवादी एक पाऊल पुढे, प्रकाश आंबेडकरांना 6 जागा सोडण्याची तयारी?

-शेतकऱ्यांच्या नावावर 2 हजार कोटींचा गैरव्यवहार, कमलनाथ यांचा आरोप

-थोडा धीर धरा, वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसशी आघाडी होईल- आंबेडकर

-नरेंद्र मोदींचं नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’ ठेवावं लागेल- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या