महाराष्ट्र मुंबई

“पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात”

मुंबई |यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणं गरजेचं आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणं आवश्यक होतं. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी आहे.

वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असं यशोमती ठाकूर यांचं म्हणणं आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणं आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

परिवहन मंत्री अनिल परब यांची उपचारांनंतर कोरोनावर मात

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून नवरात्रीच्या शुभेच्छा!

पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीसांचं बिहारमधून उद्धव ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या