बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी आता बॅगा भरून ठेवाव्यात”

कोल्हापूर | केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात एकापाठोपाठ एक कारवाईचा सपाटा लावला आहे. तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजप (BJP) विरूद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वाद शिगेला पोहोचला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

माझ्या वक्तव्याची महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार चेष्टा केली जाते. मात्र, सगळी चेष्टा त्यांच्या अंगलट येणार आहे. मी जे म्हणत गेलो तेच होत गेलं. जे जात्यात होतं त्याचं पीठ झालं आणि जे सुपात होतं ते आता जात्यात जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात, असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) निशाणा साधला. राज्य सरकार उद्धव ठाकरे नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चालवतात आणि ही वस्तूस्थिती आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या चेष्टा अंगलट येईल या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेनेची केलेली चेष्टा किती महागात पडलीये हा अनुभव आपण घेताय, असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

डिजीटल माध्यमासाठीचा पत्रकारिता पुरस्कार ‘थोडक्यात’ला; कृष्णा वर्पेंचा सन्मान

कोरोनाच्या स्टेल्थ व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

मिस यूनिवर्स हरनाज संधूचं हिजाब वादावर मोठं वक्तव्य, म्हणाली…

“25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे”

मोठी बातमी! रशियाच्या मागण्यांवर झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More