बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नैसर्गिक आपत्ती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकारची रिक्षा पंक्चर”

औरंंगाबाद | राज्यात अतिवृष्टीमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रायगडमधील तळीये गावावर दरड कोसळल्याने 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यु झाला. महापूराच्या पाण्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झालीत. तर अनेक व्यापारांच्या मालाचं नुकसान झालं आहे. यावरून विरोधी पक्षाचे नेते चंंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात आलेली नैसर्गिक संपत्ती हाताळण्यात महाविकास सरकारची रिक्षाची सर्व चाकं पंक्चर झाली आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे संकट जरी अस्मानी असलं तरी सुलतानी हाताळणीमुळे त्याचं गांभीर्य वाढल्याचं चंंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. औरंगाबादमध्ये ते बोलत होते.

 महाविकास आघााडी सरकारच्या तिन्ही चाकांचे तुकडे उडायला सुरुवात झाली आहे. हा सांगाडा कुणी भंगारातही विकत घेणार नाही. मुख्यमंत्री हे मुंबईतून तर उपमुख्यमंत्री हे पुणे आणि बारामतीतून बाहेर पडत नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील विविध भागातील लोकं हाल सोसत आहेत, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळेंच्या टीकेला सरकारमधील नेत्यांकडून काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

उर्वरित आयपीलचा मुहूर्त ठरला, या तारखेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार!

धक्कादायक! महाराष्ट्रात महापुरामुळे बळी पडलेल्यांचा आकडा 137 वर

मुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More