मुंबई | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे. त्यांचा पराभव सेना-भाजपाच्या जिव्हारी लागलाय. यावरच भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी भाष्य केलंय.
शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला, असं म्हणत त्यांनी खैरेंच्या पराभवाला जाधव यांना जबाबदार धरलं.
औरंगाबादेत मतविभाजन झाल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला आणि फायदा एमआयएमच्या उमेदवाराला झाला. रावसाहेब दानवेंनी कुठल्याही प्रकारे जावयाला मदत केली नाही, असंही पाटील म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 टक्के जागावाटप होऊ शकते. मात्र अडीज-अडीज वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत माहिती नाही, असंही पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ‘ईडीे’ने पाठवली नोटीस
-आम्ही तुमच्यासोबत का यावं??; वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल
-गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच अमित शहा म्हणतात…
…नाहीतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊ देणार नाही- वंचित बहुजन आघाडी
-‘होय मी प्रेम करते’; लोकसभेतल्या ‘या’ महिला खासदाराने दिली प्रेमाची जाहीर कबुली
Comments are closed.