“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”

कोल्हापुर |  आघाडीचा उमेदवार व्हायला कुणी तयार नाही. अशातच येणारा आठवडा विविध राजकीय घडामोडींनी गाजणार आहे, असं सूचक वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं आहे.

भाजपमध्ये काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांचं जोरदार इनकमिंग चालू आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात देखील आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे स्पष्ट संकेत पाटील यांनी दिले आहेत.

निवडणूक आणि निकाल ही फक्त औपचारिकता आहे, असं म्हणत चंद्रकांत दादांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता

भाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार

भाजपचं कमळ हाती घेणार का? काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात…

राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी देऊन कर्डिलेंची गोची केलीय का? संग्राम जगताप म्हणतात…

भाजपमध्ये प्रवेश करणार का? काँग्रेस नेते प्रतिक पाटील म्हणतात…..