बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एमआयएमने बदमाशी केल्यास सोडणार नाही; पराभवानंतर चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य

औरंगाबाद | एमआयएमने जास्त बदमाशी केल्यास सोडणार नाही, असं वक्तव्य औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलते होते.

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला आहे. यावेळी काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. याचा संदर्भ देत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

खैरे यांना त्यांच्या पराभवाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी माझं नशीबच खराब म्हणून मी हरलो, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत पाहायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या

-जावई पडल्यापेक्षा चंद्रकांत खैरे पडल्याचं जास्त दु:ख- रावसाहेब दानवे

-संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

-काल निवडून आलेला हा नातू आज आजोबांसाठी राजीनामा देण्याच्या तयारीत!

-ऐतिहासिक विजयानंतर बॉलिवुडमधून मोदींवर शुभच्छांचा वर्षाव

-पराभवानंतरही काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे ‘या’ शब्दांवर ठाम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More