माझ्यामुळेच हर्षवर्धन जाधवांची आमदारकी टिकली; खैरैंचा गौप्यस्फोट

औरंगाबाद | तेव्हा मी वाचवलं नसतं तर हर्षवर्धन जाधवांची आमदारकी कधीच गेली असती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर दोन वर्षापुर्वीच त्याने आमदाराकीचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. मी त्याला घेऊन मुंबईला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. साहेब खूप रागावलेले होते. त्यांनी नालायक वगैरे म्हणत खूप खडसावले आणि त्याचा राजीनामा नामंजूर केला. तेव्हा मी वाचवलं नसतं तर याची आमदारकी तेव्हाच गेली असती, असं ते म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव आपला नवा पक्ष काढून चंद्रकांत खैरें यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान देणार आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुम्ही नसता तर काय झालं असतं याची कल्पनाच करु शकत नाही- जयंत पाटील

-साखर कारखाने राजकारणाचे अड्डे बनलेत- सदाभाऊ खोत

-शरद पवार मराठवाड्यात दाखल; निवडणुकांचं फुंकणार रणशिंग?

-…तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारू!

-रावसाहेब दानवेंचा घोड्यावरून राजेशाही थाट… मागे जनता सैरभैर; पहा व्हिडिओ

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या