औरंगाबाद महाराष्ट्र

“बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की…”

औरंगाबाद | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर सामनातील रोखठोक या सदरातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला होता. या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून मार्ग काढतील. मात्र औरंगाबादचे नामांतर होणार म्हणजे होणार, हे निश्चित आहे, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय.

बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होटबँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

आगामी काळात काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास मला वाटत असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराची थेट सुप्रिया सुळेंकडे मंत्रिपदाची मागणी!

“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?”

“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”

शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन!

पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या