बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आडवं करू’; चंद्रकांत खैरे आक्रमक

औरंगाबाद | मातोश्रीवरून आलेला प्रत्येक आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य आहे. आता आम्ही दोघे मिळून औरंगाबादमध्ये शिवसेनेतून जे लोक फुटले आहेत, त्यांना आडवं करू. त्यासाठी आम्ही दोघे काफी आहोत, असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय.

अंबादास दानवे यांची नुकतीच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर अंबादास दानवे यांनी औरंगाबादमधील चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी बजावतील. अंबादास दानवे हे प्रचंड अभ्यासू आहेत. ते आगामी काळात माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगलं काम करतील, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या- 

24 तासांमध्ये संजय शिरसाटांचा यू-टर्न, आता म्हणतात…

VLC Media Player या अॅपवर भारतात बंदी, ‘हे’ मोठं कारण आलं समोर

मोठी बातमी! जात पडताळणी समितीचा समीर वानखेडेंना दिलासा

नवऱ्यानेच भर मंडपात लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ, व्हायरल क्लीपने मोठी खळबळ

“विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना संपवणं हेच भाजपच धोरण”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More