दानवेंनी केलेलं काम माझ्या जीवाला लागलंय, ते कधीही विसरणार नाही- चंद्रकांत खैरे

दानवेंनी केलेलं काम माझ्या जीवाला लागलंय, ते कधीही विसरणार नाही- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जे माझ्यासोबत केलंय ते माझ्या जीवाला खूप लागलंय. ते मी कधीही विसरणार नाही, असं म्हणत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे.

दानवेंच्या जावयाबद्दल मला बोलायचं नाही. जो स्वत:च्या बापाला मारु शकतो, त्याचा पराभव निश्चित आहे, असं म्हणत त्यांनी दानवे आणि औरंगाबादमधील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली आहे.

परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे माझा विजय नक्की होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, दानवे यांनी युती धर्म पाळला नाही. ते जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत करत आहेत, असा आरोप खैरे यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या

-शहांकडून उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा बेत; पण डीश सर्व्ह करायला जाणार हे शिवसेना नेते

-पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराला ईव्हीएमवर शंका; म्हणून केली मतमोजणी केंद्राची पाहणी

एक्झिट पोलने वर्तवला निलेश राणेंचा पराभव; यावर नितेश म्हणतात…

-निवृत्तीनंतर काय करणार? धोनीने केला खुलासा…

-काँग्रेसचे उमेदवार पडावे म्हणूनच ‘वंचित’ने उमेदवार उभे केले; अशोक चव्हाणांचा सनसनाटी आरोप

Google+ Linkedin