आम्हाला दिल्लीत पवारांचाच आधार होता- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रश्न असो किंवा संसदेत वागायचे कसे असा प्रश्न असो,  शरद पवार नेहमीच मार्गदर्शन करायचे. दिल्लीत आम्हाला पवारांचाच आधार होता, अशा भावना चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केल्या.

औरंगाबादमध्ये शरद पवारांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

पवारांच्या सत्कार सोहळ्याच्या भाषणांची सुरुवात खैरे यांच्यापासून झाली. आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी पवारांचा भगवी शाल घालून सत्कार केला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

शरद पवार यांचं औरंगाबादमधील संपूर्ण भाषण- 

a1 - #सविस्तर | शरद पवारांची दोन भाषणं, जशीच्या तशी...

माझ्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज औरंगाबाद येथे नागरी सत्कार समिती व संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझ्याबद्दल बोलले त्याबद्दल मी या सर्वांचा आभारी आहे. मंचकावर सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहता महाराष्ट्रात सभ्य राजकारणाची पद्धत आजही कायम आहे हे पाहून समाधानही वाटलं.

a2 - #सविस्तर | शरद पवारांची दोन भाषणं, जशीच्या तशी...

माझ्या जडणघडणीत अनेकांचा हातभार आहे. मी महाराष्ट्राचे सगळे जिल्हे फिरलो. राज्याच्या कान्याकोपऱ्यात जाऊन आलो. त्यामुळे तिथली माणसं समजली, संस्कृती समजली याचा आनंद आहे. काँग्रेसमध्ये असताना एकदा असं घडलं की शरद पवारला टिकीट द्यायचं नाही असं काहींनी ठरवलं. ही बाब विनायक पाटील आणि मा. यशवंतराव चव्हाण यांना कळली आणि त्यांनी त्या मंडळींना मला टिकीट देण्यास सूचना केल्या. विनायकराव आणि यशवंतराव यांची शक्ती माझ्यामागे होती म्हणून मी विधानभवनात पोहोचू शकलो. मराठवाड्यातून अशी अनेक चांगली माणसं मला लाभली. हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा आहे. संकटं अनेक आली पण त्या संकटांना सामोरे गेलो.

a3 - #सविस्तर | शरद पवारांची दोन भाषणं, जशीच्या तशी...

मुख्यमंत्री असताना लातूर येथे भूकंप झाल्याची बातमी मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जिथे भूकंपाचं केंद्र स्थान होतं त्या गावात दाखल झालो. तिथली परिस्थिती फार वाईट होती. असं भयानक चित्र मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. संपूर्ण लक्ष तिथे केंद्रित करत लोकांना मदत केली. दोन-तीन महिने पुरेल इतका धन्यसाठा तिथे उपलब्ध केला. सर्व निर्णय तात्काळ घेतले. संकटात महाराष्ट्राला सोडायचं नाही अशी भावना त्यावेळी मनात होती. लातूरसाठी संपूर्ण महाराष्ट्र धावून आला होता. यानिमित्ताने मराठवाड्याची एकी दिसली.

नामांतराच्या वेळीही अशाच संकटांना समोरे जावे लागले. दंगली पेटल्या होत्या, विद्यार्थ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं, पण शेवटी विद्यापीठाचा नामविस्तार केलाच. मला संपूर्ण कारकीर्दीत विकासकामांची संधी मिळाली. या कामांमध्ये लोकांची साथ लाभली त्यासाठी त्यांचे आभार मानतो.

a4 - #सविस्तर | शरद पवारांची दोन भाषणं, जशीच्या तशी...

सध्या राज्यभरात कर्जमाफीची चर्चा आहे. काही लोक विचारतात कशासाठी हवी आहे कर्जमाफी? आज आपण सर्वच जण शेतकऱ्यांवर अवलंबून आहोत त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार कमी व्हायलाच हवा. शेतकरी काही भीक मागत नाहीत. देशाच्या प्रमुखाने संपूर्ण देशाचा विचार करावा केवळ एका राज्याचा नवे. उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे कर्जमाफी केली त्याप्रमाणे राज्यात ही सरसकट कर्जमाफी व्हायला हवी.⁠⁠⁠⁠

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या