‘लोकसभेवेळी दानवेंनी पैसै वाटून माझा पराभव केला’; शिवसेनेच्या बड्या खासदाराचा गंभीर आरोप
औरंगाबाद | भाजप नेते आणि केंद्रीय मंंत्री रावसाहेब दानवे यांनी रूग्णालयात असताना पैशाचं वाटप केलं आहे. त्यांनी पैसे वाटल्यामुळेच माझा पराभव झाला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. माध्यमांशी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीवेळी रावसाहेब दावनेंच्या जावयाने पैशाचं वाटप केलं होतं. जावयाला पुढे करत त्यांनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता रावसाहेब दानवे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी बोलताना खैरेंनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर भाष्य केलं.
भागवत कराड यांनी मीच नगरसेवक केलं आहे. मीच त्यांना महापौर केलं असून त्यांच्यापेक्षा मी मोठा नेता आहे. त्यामुळे त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही. मराठवाडा हा शिवसेनेचा गड असून इथे भाजप यशस्वी होऊ शकणार नसल्याचं खैरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी भागवत कराड यांनी मंत्रीपद देण्यात आलं आहे. उलट बर झालं कारण आमचेही कार्यकर्ते खडबडून जागे झाले होतात आणि कामाला लागतात. त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं तरी काही हरकत नाही. कारण शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, युतीमध्येही शिवसेनेसाठी ही जागा होती आणि महाविकास आघाडीतही राहणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराविरोधात विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा!
“मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतंय”
…म्हणून मीराबाई चानूच्या भेटीनंतर सलमान खान झाला ट्रोल!
‘कोल्हापूरचं नाव कलापूर करावं’; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी
हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू; मोदींकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर
Comments are closed.