बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भागवत कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही- चंद्रकांत खैरे

औरंगाबाद | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतलेले औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खोचक टीका केली आहे. भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं, मीच त्यांना महापौर केलं, कराडांपेक्षा मी खूप मोठा नेता आहे. त्यांची आणि माझी तुलना कधीच नाही होऊ शकत, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय.

शिवसेनेला शह देण्यासाठी जर कोणी कराडांना मंत्री केलं असेल तर चांगलंच आहे. या अगोदर पण असे खूप प्रयत्न झाले पण शिवसेना ही मराठवाड्यात आपले पाय भक्कम रोवून उभी आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यांना भाजपने आमच्या विरोधात लोकसभेचं तिकीट दिलं तरी आम्हाला आनंद आहे, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.

मी दिल्लीत गेलो होतो. पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. ते येतील मला भेटायला. ते मला नेताच मानतात. मी त्यांना खूप सीनियर आहे, असं ते म्हणाले. मला ज्यांनी पाडलं त्या दानवेंना मी का शुभेच्छा द्याव्यात? असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, दानवेंनी भाजपचे 15 आमदार माझ्याविरोधात कामाला लावले. दानवेंमुळे अर्धा भाजप माझ्याविरोधात काम करत होता. त्यांचं काय अभिनंदन करायचं, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या

‘अगर आप करते रहेंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा’; आठवलेंचा विरोधकांना काव्यमय इशारा

के. एल राहुलचं दमदार शतक; तब्बल 31 वर्षांनी केला ‘हा’ विक्रम

नाशिकच्या लाचखोर फरार महिला शिक्षणाधिकारी यांची संपत्ती पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

दिलासादायक! खाजगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, ठाकरे सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला घामटा, अँडरसनच्या अफलातून चेंडूने शतकापासून ठेवलं दूर; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More