चंद्रकांत खैरेंना रोखा, नाहीतर माझा मार्ग मोकळा- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार चंद्रकांत खैरेंना रोखावं, त्यांना समज द्यावी अन्यथा माझा मार्ग मोकळा आहे, असा इशारा शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय. 

आपण यासंदर्भात उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. त्यानंतरही काही झाले नाही तर मग माझा मार्ग मोकळा आहे. भाजप-कॉंग्रेसचा पर्याय माझ्या समोर आहे, मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन, असं जाधव यांनी म्हटलंय.