बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो”

औरंगाबाद | औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील लॉकडाऊनवरुन AIMIM खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपली आहे. जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करतात, असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

लॉकडाऊन उघडलं तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. त्यामुळे दुकाने उघडायला तो आला तर शिवसैनिक उत्तर देतील. तसेच इम्तियाज जलीलवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी कोणत्याही परिस्थितीत 1 जूनला औरंगाबादेत दुकानं उघडणारच, असा इशारा दिला आहे. तर इम्तियाज जलील यांनी 1 तारखेला दुकानं उघडून दाखवावी. शिवसेना 1 तारखेला रस्त्यावर उतरेल, असा इशारा  चंद्रकांत खैरे यांनी जलील यांना दिला आहे.

दरम्यान, औरंगाबादेत सध्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या मुद्द्यावरून संघर्ष पेटत असल्याचं दिसत आहे. 1 जूननंतर लॉकडाउनचं नेमकं काय होणार याचं अद्याप काही निश्चित ठरलेलं नाही. असं असतानाही आधीच यावरून वाद सुरू झाला आहे. कोरोनामुळे शांत झालेलं औरंगाबादचं राजकीय वातावरण आता कोरोनामुळंच तापायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाला रोखण्यासाठी ‘या’ आमदाराने शहरातील गल्ल्यांमध्ये फिरवला होमयज्ञ!

कोणाच्या जीवावर गिरीश कुबेर यांनी हे धाडस केलं?- नारायण राणे

‘अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!’ बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी ‘ही’ अभिनेत्री झाली ट्रोल

कारागृहात जाताच ढसाढसा रडला पैलवान सुशीलकुमार, अशी गेली पहिली रात्र!

“मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, मुलं जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More