सांगली | दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन योग्यप्रकारे न हाताळल्यामुळे हिंसाचाराची परिस्थिती उद्भवल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.
हिंसाचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, असा खोटा अपप्रचार केला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून वक्तव्य करावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दिल्लीतील हिंसाचाराचे जयंत पाटील एक प्रकारे समर्थन करत आहेत, असा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला.
थोडक्यात बातम्या-
दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत”
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल!
“दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट”
दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत