Who is dhangekar?; धंगेकरांच्या विजयानंतर चंद्रकांत पाटलांचा व्हिडीओ तुफान व्हायरल
पुणे | 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मतांनी विजय झाला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. गिरीश बापट ( Girish Bapat ) यांचे नेहमीच वर्चस्व असलेल्या मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभाव स्वीकारावा लागला आहे.
रवींद्र धंगेकर याच्याकडून विजयाचा जल्लोष केला जात आहे. अशात धंगेकरांच्या विजयानंतर चंद्रकांत पाटलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कसबा पोटनिवडणुकीचा प्रचारादरम्यान भरसभेत व्हू इज धंगेकर? (Who is Dhangekar?) असा प्रश्न विचारला होता. यातून त्यांनी महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.
त्या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसने कवितेच्या माध्यमातून दिले आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.