विरोधकांनी यंदा रस्त्यावरील खड्डयांचा जास्तच बाऊ केलाय!

सोलापूर | विरोधकांनी यंदा खड्ड्यांचा जास्तच बाऊ केलाय, असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ते सोलापुरात बोलत होते.

राज्यातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडतात आणि डिसेंबरमध्ये ते बुजवले जातात हे दरवर्षीचं रूटीन काम आहे. पण यावेळेला विरोधकांनी त्याचा जास्तचं बाऊ केलाय, असं ते म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खड्डे पडलेत म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा वातारवण चिघळण्याची चिन्ह आहेत.