मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दोन वेळा हरवलं हे पवार विसरतात; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दोन वेळा हरवलं हे पवार विसरतात; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

सोलापूर | मी शरद पवारांच्याच उमेदवाराचा दोन वेळा पराभव करुन पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो होतो हे पवार विसरतात, अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.

मागच्या दाराने येणाऱ्याने एकदातरी लोकांतून निवडून यावं, अशी टीका शरद पवारांनी केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभाच काय विधानसभाही लढवू, म्हणत शरद पवार यांच्याकडून होत असलेली टीका ही 23 मे जवळ येत आहे म्हणून होत असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह 10 जागा आम्ही जिंकणार असून पवारांना याचा अंदाज असल्याने बारामती हरली तर ईव्हीएममुळे हरेल ही भाषा सुरु झाली, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

-चेन्नईची दिल्लीवर मात, आता मुंबई इंडियन्स आणि चेन्नईमध्ये अंतिम सामना

-नरेंद्र मोदींच्या द्वेषाला माझ्याकडून प्रेमाने उत्तर मिळणार- राहुल गांधी

-भाजप व्यक्तीकेंद्रीत पक्ष नाही, तो कधीच मोदी-शहांचा पक्ष होणार नाही- नितीन गडकरी

-बंडखोर बडव्यांनी पंढरपुरात उभारले स्वतंत्र विठ्ठल मंदिर

-गावात दुष्काळ असेल तर तात्काळ सरपंचाकडून कामे मागून घ्या- मुख्यमंत्री

Google+ Linkedin