बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील आणि भाजपने जनतेची माफी मागावी”

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून आकडेवारीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. परंतू  यंदाही कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी वारीवर घातलेल्या निर्बंधावरून सरकारवर टीका केली आहे. त्यातच आता उत्तराखंडमधील कावड यात्रेवरून काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

कावड यात्रा बंद करताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री जनतेच्या जीवाशी खेळ नको व देवालाही हे आवडणार नाही असं म्हणतात. आपल्या हीन राजकारणासाठी वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांनी आणि चंद्रकांत पाटलांनी आता जनतेची माफी मागावी, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कुठे गेले ते भाजप अध्यात्मिक आघाडीचे थोतांड?, असा सवाल देखील सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांवरच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा, अशी टीका भाजपने केली होती. तर आषाढी वारीवर निर्बंध घालून सरकार वारकऱ्यांवर अन्याय करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटलं होतं. वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला महत्त्व आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून या 4 ही वारी रद्द करण्यात आल्या आहेत.

औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा घणाघात तुषार भोसले यांनी केला होता. त्यानंतर आता काँग्रेसने भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सोन्याच्या दरात आज देखील वाढ, वाचा ताजे दर

शरद पवारांना राष्ट्रपती करायचं असेल तर….- प्रविण दरेकर

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला जमावाकडून बेदम मारहाण

“देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणातील सर्वात लबाड माणूस”

ड्रायव्हरला दिलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे सुजैन खान होतेय ट्रोल, पाहा व्हिडीओ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More