पुणे महाराष्ट्र

“जयंतराव फुकटातलं मिळालं ते हजम करा, आमची काळजी करू नका”

पुणे | आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका प्रखरपणे राबवत आहोत. त्याची जयंतरावांनी काळजी करू नये. फुकटातलं जे मिळालंय ते व्यवस्थित हजम करा, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

फुकटात मिळालेली सत्ता जास्तीत जास्त काळ कशी राहील यासाठी दिवसरात्र मेहनत घ्या, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना दिला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी यापूर्वी आम्ही चांगले काम केले आहे. तसेच कौशल्य विकासावर आम्ही अधिक काम करू. सरकारी खात्यात रिकाम्या जागा भरण्यासाठीही प्रयत्न करू, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, ठाकरे सरकार गोंधळलेलं सरकार आहे. सार्थी रद्द केली, अण्णासाहेब पाटीर महामंडळ बरखास्त केलं, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि महिला अत्याचारांसह विविध मुद्द्यांवर या सरकारचा गोंधळ आहे. या सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

महत्वात्या बातम्या-

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष, त्याचा मला अहंकार नाही तर प्रेम- पंकजा मुंडे

“पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षं पूर्ण करणार”

भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषी मंत्री गहिवरल

बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढवणार एमआयएम

बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या