महाराष्ट्र सांगली

“माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय मागे घेणाऱ्यांनी मला शिकवू नये”

सांगली | महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना शरद पवार गप्प का?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना केला होता. याला शरद पवारांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला लगावला.

ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का, असा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया देत पवारांवर पलटवार केलाय.

माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचं जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

मला गाव सोडून जावं लागतं असं शरद पवार बोलले. पवारांना माढा मधून लढावं लागलं. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडाव लागलं. पक्षा पेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”

तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!

“माझी सत्ता, माझी मनमानी असा राज्य सरकारचा कारभार चाललाय”

टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??

…मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या