मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मॅच फिक्सिंग केलं असल्याचा आरोप दिल्ली विधानसभेत जोरदार प्रचार करणारे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. जर हिंमत असेल तर भाजपसमोर एकटं लढून दाखवा, असं आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपला देशभर उघड पाडण्यासाठी सर्व पक्ष काय वाटेल ते करायला तयार असतात. महाराष्ट्र उत्तम उदाहरण आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
आमच्या 3 पैकी 1 जरी जागा जास्त आली तरी तो आमचा विजय आहे. आम्ही 25 ते 30 च्या आसपास जाऊ, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
ज्या काँग्रेसने 15 वर्षे राज्य केली त्यांना भोपळाही फोडता आला नाही. हे आम्ही अपयश मानत नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
दिल्लीकरांनो… तुम्ही भारताच्या आत्म्याचं रक्षण केलं- प्रशांत किशोर
“हारलोत तर मेहनत करणार आणि जिंकलोत तर अजून मेहनत करणार”
महत्वाच्या बातम्या-
केजरीवालांच्या दणदणीत विजयानंतर शरद पवार म्हणाले….
दिल्लीत 12 मुख्यमंत्री जाऊनही भाजपचा पराभव झाला- रोहित पवार
केजरीवालांच्या तोडीस उमेदवार द्यायला आम्ही कमी पडलो- सुधीर मुनगंटीवार
Comments are closed.