Top News महाराष्ट्र सोलापूर

हिंमत असेल तर शिवसेनेने एकट्याने विधानसभा लढवावी- चंद्रकांत पाटील

सोलापूर | शिवसेनेत हिंमत असेल तर राज्यात पुन्हा विधानसभा निवडणूक झाली तर सेनेनं एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. ते सोलापूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

देशाचं अहित झालं तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत भाजप नको असं राजकारण सध्या सुरु आहे, असं पाटील म्हणाले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकांवरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जसं काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आणि त्यांच्यामुळेच अरविंद केजरीवाल यांचा विजय झाला, अशा थाटात हे नेते बोलत आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीवर जोरदार टीका सुरु केली आहे. तसेच डिसेंबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??”

‘माझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार’; हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

महत्वाच्या बातम्या-

शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जेसीबी लावून हटवल्याने संभाजीराजे संतापले

“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय, पण फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत”

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर बाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या