पुणे महाराष्ट्र

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

पुणे | कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचं प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है असंही सांगितलं. तसेच मी त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणी ही कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी आपण आपले काम करीत रहायचे आणि तेच मी आजवर करीत आलो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

‘कोणाच्या जिवावर माज करतात’; प्राजक्ता गायकवाडवर अलका कुबल भडकल्या

“…तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही”

“मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र”

’14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले’; आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या