पुणे | पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पाटील खरंच कोल्हापूर जाणार आहेत की काय या चर्चेला उधाण आलं होतं. यावर पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी कोल्हापूरला जाणार याने कोणी हुरुळून अथवा घाबरून जाऊ नये. केंद्राने मला मिशन दिलं आहे ते पूर्ण केल्यानंतरच मी कोल्हापूरला जाणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
1980 ते 1993 या काळात मी घर सोडलं होतं. केंद्राने मला सहजासहजी पाठवलं नसून जे मिशन दिलं आहे हे ते पुर्ण करण्यासाठी मला दहा, वीस, पंचवीस वर्षे असा कितीही कालावधी लागणार असल्याचं पाटलांनी सांगितलं.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना केंद्रानं नेमकं कोणत मिशन दिलं आहे याबाबतची उत्सुकता आता वाढली आहे. मात्र काल पाटील म्हणाले की मी कोल्हापूरला जाणार त्यावरून मात्र विरोधी नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
…अन् फॅनच्या फूड स्टॉलला सोनू सूदने दिली सरप्राईज विझीट
“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे पण हीच शिवसेना…”
एमआयएमचा डोळा असलेली ‘ही’ महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचाय
पोलिसांचा कॅफेवर छापा; तपासादरम्यान समोर आला धक्कादायक प्रकार
इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार