महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

पवारांच्या घरातला व्यक्ती भाजपमध्ये आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका- चंद्रकांत पाटील

मुंबई |  काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं माहीत नाही, पण त्यांची मुलं तिथं कंटाळली आहेत. त्यामुळेच ती आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये आलं तर आश्चर्य वाटू देऊ नका, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आता थकले आहेत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील, असं वक्तव्य काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. यांच्या याच वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला.  त्यावेळी त्यांनी पवार घराण्यातील व्यक्ती भाजपात प्रवेश करू शकतो, असे संकेतच दिले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र चंद्रकांत पाटील यांची ‘चंपाला पवारांवर बोलल्याशिवाय जमतच नाही’, असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या