पुणे महाराष्ट्र

शरद पवार आणि शिवसेनेनं भाजपला खिजवण्याचं काम करू नये- चंद्रकांत पाटील

पुणे | दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनंही मिरवू नये. काँग्रेसने दिल्लीत शरणागती पत्करली त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. शरद पवार आणि शिवसेेनेनं भाजपला खिजवण्याचं काम करू नये, अशा शब्दांत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि शिवसेनेला सुनावलं आहे.

आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशात शरद पवार आणि शिवसेनेचं काहीही योगदान नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा माझी निवड झाली, याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. नजीकच्या काळात घटनात्मक रचना पुन्हा नीट करण्याचं मोठं आव्हान आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अचानक गेलेल्या सरकारमुळे जी मरगळ आली, ती झटकून कार्यकर्ते पुन्हा एकदा कसे जोमाने कामाला लागतील हे पाहणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या- 

‘आमचं उष्ट कोणी खाऊ नये’; गुलाबराव पाटलांचा मनसेला टोला

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

महत्वाच्या बातम्या- 

पुण्यात हा काय प्रकार सुरुय?; सविताभाभी तू इथंच थांब!

पेस्ट कंट्रोलनंतर खबरदारी न घेणं जिवावर बेतलं; पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

“उद्धवजी, राष्ट्रपुरूषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या