मुंबई | जतनेच्या विश्वासघात करुन आलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप प्रबळ विरोधीपक्ष म्हणून संघर्ष करणार आहे. सत्तेत आलेल्या शिवसेनेला केवळ पवारांची भाषा समजते. सत्तेसाठी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे भाऊ-भाऊ आहेत केव्हाही एकत्र येतील, असं दोन दिवसांपूर्वीत बोलणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी शिवसेना हीच भाजपचं लक्ष्य राहिल, असं सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच भाषा समजते. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार काहीच दिवसात कोसळेल आणि शिवसेनेसोबत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची आशा काही भाजपच्या नेत्यांना आहे. या स्वप्नात असलेल्या नेत्यांनी स्वप्नात राहू नका, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला
तुकाराम मुंडेंची धडक कारवाई; कुख्यात गुंडाच्या आलिशान बंगल्यावर हातोडा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा- सोनिया गांधी
दिल्ली शांत करण्याची जबाबदारी मोदी-शहांनी सोपवली ‘या’ व्यक्तीवर
दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Comments are closed.