Top News महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या”

photo credit- Facebook account Dhananjay Munde, sanjay rathod, chandrakant patil

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. सोशल मीडियावर या बाबतीत काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महाभकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारभारात महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालीच नाही. मात्र वर्षभरात या सरकामधील अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी आणि मुजोरपणा राज्यातील जनतेसमोर उघड झाला, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यावर त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले. आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. यावर प्रकरणाची चौकशी झाल्यावर निर्णय घेऊ असं सांगत महाविकास आघाडीमधील जाणता राजाने त्या मंत्र्यांना आणि त्यांच्या कथिक कृत्यांना पाठीशी घातलं, असा आरोपही पाटलांनी रा ष्ट्वादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.

दरम्यान, राज्यातील जनतेला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. आघाडीच्या या ऑटोरिक्षा सरकारच्या तीन चाकात अनेक छिद्रे पडली असून हे सरकार म्हणजे पंक्चर सरकार आहे. राज्यातील जनतेने भाजप-सेना युतील कौल दिला आहे. बेईमानी लबाडी आणि लाचारी करुन राज्यात महाभकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं असल्याचं पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पूजाने आत्महत्या केली नाही तर…’; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट!

घरकाम करणाऱ्या तरूणीसोबत पोलीस अधिकाऱ्याने केलं हे धक्कादायक कृत्य

“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”

तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार

“माझी सत्ता, माझी मनमानी असा राज्य सरकारचा कारभार चाललाय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या