मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीच अलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच राजकीय हालचालींनाही मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे.
गृहखात्याच्या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा रंगल्या असतानाच आता या मुद्द्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी कोणालाही सोबत घ्यायला तयार असतो, त्यामुळे भूमिका बदलणारा हा पक्ष दगा देणारा आहे, असा टोला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा रिमोट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आपण गृहखाते तुमच्याकडे ठेवा अशी विनंती केली होती, हे खाते दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील असा इशाराही दिला होता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, गृहखात्याच्यावरुन राजकारण पेटलेलं आहे. यातच महाविकास आघाडी सरकारकडून कोणाविषयी नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“गृहखाते शिवसेनेकडे दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर कॅमेरे लावतील”
अभिनेत्री विशाखा सुभेदारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली…
“मुख्यमंत्री नाराज नाहीत, गृहखात्यामध्ये काही कमतरता असेल तर…”
गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन, म्हणाले…
“The Kashmir Files चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती”
Comments are closed.