बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी सरकारच्या टाळाटाळीमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले”

मुंबई | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या टाळाटाळीमुळे ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारकडे कोणतीही सबब उरलेली नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणूकांतही महाविकास आघाडीमुळे ओबीसींना आरक्षणाला मुकावे लागले तर भाजप ते सहन करणार नाही’, अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.

‘महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष इंपिरिकल डेटा (Impirical Data) गोळा करण्याचे टाळल्यामुळे ओबीसी समाजाचे आज पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले. या सरकारने डेटा गोळा करण्यात अजूनही टाळाटाळ केली तर भाजप (BJP) तीव्र आंदोलन करेल’, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) आता पूर्ण शक्तिनिशी डेटा गोळा करून ओबीसींचे आरक्षण पुन्हा प्रस्थापित केले पाहिजे, असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे. तर सरकारने वेळकाढूपणा चालू ठेवला तर भाजप तीव्र आंदोलन करेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

क्वारंटाईनचे नियम तोडून आलिया भट्ट पोहोचली दिल्लीला; आता मुंबईत परतताच…

टीम इंडियात नक्की चाललंय का?, सौरव गांगुलीचा दावा कोहलीने फेटाळला

हरभजन सिंग काॅंग्रेसमध्ये जाणार का?; सिद्धूंच्या ट्विटची एकच चर्चा

Omicron नाही तर ‘या’ व्हेरियंटचा अधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

“जोपर्यंत ‘तो’ मंत्री जेलमध्ये जात नाही तोपर्यंत…”, राहुल गांधी आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More