“संजय राऊतांचा हेतू संशयास्पद, त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का?”
पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली. संजय राऊतांनी रश्मी उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा मुद्दा पत्रकार परिषदेत अचानक पुढे आणल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊतांनी आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती तर त्यांनी त्यांच्यावरील आरोपांबद्दल बोलायला हवं होतं, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.
खूप दिवसांपूर्वी बाहेर आलेला मुख्यमंत्र्यांचा 19 बंगल्यांचा विषय पुन्हा काढून तो पटलावर आणला, रश्मी उद्धव ठाकरेंचा विषयही पुढे आणला. संजय राऊत यांनी बंगल्यांचा विषय काढण्याचे काहीच कारण नव्हते, त्यांचा हेतू संशयास्पद आहे. त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का?, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर केला आहे.
दरम्यान, संजय राऊत हे कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालतात. कोणाच्या ते सर्वांना माहिती आहे. त्या इशाऱ्यानुसार राऊत मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का?, असे अनेक सवाल उपस्थित होतात, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
सुशांत सिंह प्रकरणावर नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
राणे-शिवसेना वाद टोकाला! नारायण राणेंचा ‘अधिष’ महापालिकेच्या रडारवर
चंद्रकांत पाटलांनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले “रश्मी ठाकरेंना सामनाच्या…”
धोनीच्या चेन्नईने कोट्यावधींना विकत घेतलेल्या ‘या’ युवा खेळाडूवर गंभीर आरोप
Comments are closed.