पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांवर उपहासात्मक टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना आवरावं, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला होता. यावर संजय राऊतांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांचा पक्ष झिजतोय त्याकडे लक्ष द्यावं अशी टीका केली. यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी राऊतांना टोला लगावला आहे.
संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवरून पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला. यावर बोलताना मी संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही. संजय राऊतांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्र्वरही करणार नाही, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटलांनी केली.
दरम्यान, उद्धवजी काही झालं तरी आमचे मित्र आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय. कोण संजय राऊत ओ? काल परवा आले शिवसेनेत आणि ते कोणाला शिकवताय?, असा घणाघात देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावातील पहिलंच अक्षर खराब आहे”
आमरण उपोषण नक्की कशासाठी?; छत्रपती संभाजीराजेंनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या मागण्या
“राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, मुंबई बाहेरही राज्य आहे, “
Corona: 12 वर्षांवरील मुलांसाठी आता ‘या’ लसीला मंजुरी
Weather Update: पुढील 3 दिवस ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता
Comments are closed.