बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2014 ला नरेंद्र मोदी हे उगाच निवडून आले नाहीत, भाजप हा…..”

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) अग्रलेखातून भाजपच्या (BJP) हिंदुत्ववादावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. आयोध्या येथील जमीन घोटाळा प्रकरणात भाजपची भूमिका संशयास्पद असल्याची टीका देखील शिवसेनेने (Shivsena) केली आहे.

सामनातून केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आरोप केल्यावर चौकशी होते, चौकशी केल्यावर सगळं बाहेर येईल. सर्वसामान्य हिंदूना भाजप आपलं हिताचं रक्षण करणारी पार्टी वाटते, उगाच 2014 ला मोदी निवडून आले का?’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) दिली आहे.

हिंदुत्वाची भूमिका सोडल्यानंतर ज्या प्रकारे आमदार आणि खासदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत ते पाहून शिवसेना अस्वस्थ झाली, अशी खोचक टीका पाटलांनी केली आहे. तर जनताच ठरवेल कोणाचे हिंदुत्व खरे आहे ते, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मी ठाकरे कुटुंबाचा हितचिंतक आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची मी चेष्टा उडवत नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबद्दल तक्रार नाही पण त्यांनी कोणाकडे तरी कामकाज द्यावे, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणाचा तपास स्थगित; ‘हे’ कारण आलं समोर

‘नितेश राणेंनी माफी मागावी’; राणेंच्या ‘त्या’ ट्विटनं शिवसैनिक आक्रमक

Omicronबाबत केलेल्या अभ्यासातून ‘ही’ दिलासादायक माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले…

‘सात समंदर पार’ गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

एसटी संप: कर्मचारी आज कामावर रुजू न झाल्यास होणार ‘ही’ मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More