बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राहुल गांधी म्हणजे राजकीय विनोदरत्न’; चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

मुंबई | देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असतानाच राजकारणाला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी मित्र’ म्हणत टीका केली होती. त्यावरून भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं होतं. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधींना सिरमच्या घोषणेमुळे मोदींच्या मित्रांचा फायदा दिसत आहे. सध्या कोरोनाची लागण झालेले काँग्रेसचे नेते आणि देशातील एकमेव राजकीय विनोदरत्न राहुल गांधी यांच्यावर सध्या परिणाम झाला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सिरमने आपल्या लसीची किंमत पारदर्शकपणे लोकांसमोर ठेवली आहे. आजही जगातील अन्य सर्व लसीपेक्षा सिरमची लस स्वस्त आहे. राहुल गांधी यांची ही भूमिका देशविरोधी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारवर देखील निशाणा साधला. महाराष्ट्राचं हे दुर्भाग्य आहे की त्याला आजच्या कठीण काळात अशा संकुचित विचारांचं सरकार मिळालं, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, तुमच्याकडे राहुल गांधी यांना जागा दाखवायची आणि सिरमकडून शक्य तितक्या अधिक लसी घेण्याची नामी संधी चालून आली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी मित्रपक्षांतील नेत्यांना वायफळ बडबड करण्यापासून रोखावं, असा सल्ला देखील त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”

“…तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते”

‘या चोराकडून शिका’; कोरोना लस आणि इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला

“राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडीट करा”

“…तर राजकारणात नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More