बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तसं आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”

पुणे | ज्याचा हातामध्ये वाढण असत, तो आपल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त वाढतो तस आदित्य ठाकरे यांना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भल आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री आहेत त्यामुळे मुंबईमधील ८ हजार कोटींची वरळी डेअरी येथील जागा प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी दिली आहे. 8 आणि 9 हजार कोटीमध्ये महाराष्ट्राचा अख्खा दुष्काळ निघतो. त्यात टँकर, गुरांच्या छावण्या, नुकसान भरपाई द्यायची असते, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

केवळ घोषणा करायच्या लोकांना दाखवायचं की आम्ही हे केलं ते केलं आहे. साधारण 93 तासाचं अधिवेशन आणि त्यात मुलभूत प्रश्नांना हात न घालता आपल्या राजकीय सोयी ज्या आहेत त्या पटापट करून घेणं असं हे अधिवेशन झालं असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही कोणताही शोध लावत नसून प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. मात्र हे मी वारंवार म्हटलंय आज पुन्हा म्हणेल हे सरकार आम्ही पाडणार नाही आणि आम्ही ज्योतिरादित्य शिंदेही शोधणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

जयंती मल्हारराव होळकरांची, फोटो वापरला तुकोजीरावांचा; राम शिंदेंकडून मोठी चूक

“…तस आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”

महत्वाच्या बातम्या-

“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”

शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा- चंद्रकांत पाटील

नागरिकांनो घाबरून जाऊ नका, मी बरा झालोय… ऐका कोरोनाग्रस्ताचा अनुभव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More