बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोलेजी राजकारण ठेवा बाजूला, तुम्ही स्वत:ला OBC नेता समजता ना?”

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसींना (OBC Reservation) 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता राज्यातील वातावरण पेटताना दिसत आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

नाना पटोलेजी राजकारण ठेवा बाजूला जातीच्या परिभाषेमध्ये मला बोलता येत नाही. माझ्यावर आरएसएसचे संस्कार आहेत. तुम्ही स्वत:ला ओबीसी नेता समजता ना? मग ओबीसी समाजाची फसवणूक झाल्यावर सुद्धा महाविकास आघाडी नेतृत्वाला दोष न देता तुम्ही खोटा खोटा आरोप करताय. मी असं म्हणत नाही की तुम्ही चोर आहात. पण माझी मी म्हण सांगतोय की चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तुम्ही फेक ऑर्डिनन्स काढता. सर्वोच्च न्यायालयात न टिकणारा ऑर्डिनन्स काढायचा. त्याची नीट मांडणी नाही करायची. मागास आयोगाला संसाधने द्याची नाहीत. इंपेरिकल डाटा गोळा करायचा नाही आणि नंतर हात वर करायचे. सर्वोच्च न्यायलयाने फेटाळलं म्हणायचं, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ओबीसी समाजाच्या विरूद्ध सर्वोच्च न्यायालयात जाईल तो आमचा कार्यकर्ता नाही. तुम्ही फक्त नाव सांगा आता पक्षातून बाहेर काढून टाकतो. मुळात एक वर्षापूर्वी ओबीसींचं आरक्षण गेलं ते सर्व काँग्रेसचेच नेते होते, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचा एकही गुण नाही, खरा वाघ पहायला अधिवेशनात येणार”

“निवडणूक आली की आमच्या विरोधकांच्या अंगात येतं”, अजित पवारांचा टोला

“विषय राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे”, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

‘…तरच राज्यात Lockdownचा निर्णय होईल’; राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

‘त्या’ घटनेला जबाबदार कोण?; अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More