बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली’; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यात कलम 144 लागू केलं आहे. यावरून भाजप प्रदेशाध्याक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला  आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संकटाच्या काळात राजकारण न करण्याचा देखील सल्ला दिला होता. राज्यात संकंट असताना सर्वांनी एकजुटीने काम करायला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. तर समाजातील कष्टकरी वर्गाला लाॅकडाऊनचा त्रास होऊ नये, अशी भाजपची भूमिका होती.

थोडक्यात बातम्या-

“करेक्ट कार्यक्रम हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहितीये”

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला

हारी बाजी को जितना हमें आता है!; शेवटच्या 5 षटकांमध्ये चमत्कार झाला!

संचारबंदीकाळात सरकारकडून कोणाला किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More