बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

नागपूर | पुण्यातील बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन कबड्डीपटू विद्यार्थीनीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत चंद्रकांत पाटलांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या व्हायच्या. तेव्हा खुट्ट जरी झालं तरी मुख्यमंत्र्यांच्या शहरात पाकिटमारी असं चालायचं. आता नितीन राऊत झोपले का? त्यांना आता गुन्हेगारी दिसत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

चंद्रकांत पाटील आज नागपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आता नागपूरमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीकडे सरकारचे लक्ष नाही का? असा परखड सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. पूर्वी महिलांना रात्री कितीही उशीर झाला तरी त्या सुरक्षित घरी यायच्या. केवळ देवेंद्र फडणवीसांमुळे हे झालं असं नाही. तेव्हा महाराष्ट्र तसा होता. आता तो रसातळाला गेला असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्यात महिला असुरक्षित झाल्या आहेत. घरातल्या कोणालातरी सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. ज्यांना आमच्या काळात रस्त्याचे खड्डे दिसायचे त्यांना हे बलात्कार, कोयत्याने वार दिसत नाही का? असा सवाल विचारत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. अक्षरश: सत्तेसाठी किती अॅडजस्टमेंट करायची महिला सुरक्षेसाठी किती अॅडजस्टमेंट करायची अशी खोचक टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

या भाजपच्या नेत्यांवरील आरोपाचं पुढे काय झालं? राष्ट्रवादीचा पोस्टर्समधून किरीट सोमय्यांना सवाल

म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी तरुणाची रस्त्यावर कसरत, पाहा व्हिडीओ

“पीएम केअर फंडच्या संकेतस्थळावरून मोदींचा फोटो हटवा”

किरीट सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर हल्ला; म्हणाले, आज दुपारी 1 वाजता…

“कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या कुटुंबीयांना मिळणार 50,000 रुपयांची आर्थिक मदत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More