बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील आक्रमक

मुंबई | समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे हा दांभिकपणा आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

सा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आमच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे यावर भर द्यावा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे

पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही, तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

जित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे आणि चुका केल्यामुळे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाले. परिणामी सर्वसामान्य मराठा माणसासाठी विकासाचा मार्ग बंद झाला आणि तो रस्त्यावर आला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत- अजित पवार

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही- राजनाथ सिंग

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय! 31 ऑगस्टपर्यंत या वस्तूंवर आयात शुल्क माफ

DNB मेडिसीन परीक्षेत औरंगाबादमधील विद्यार्थ्याचं दैदीप्यमान यश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More