Top News

‘यांच्या बापाची पेंड आहे का?’; चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई | केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी विधेयकांचं समर्थन करण्यासाठी आणि ही विधेयके शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहेत हे सांगण्यासाठी भाजपतर्फे दौंड तालुक्यातील वरवंडपासून चौफुल्यापर्यंत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्यांदा बापाचा उल्लेख केलाय.

राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“…म्हणून डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल”

“काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्यांचे, जे कधी नाही झालं ते सगळं होत आहे”

भारतीय रेल्वेत ‘इतक्या’ लाख रिक्त पदांसाठी होणार भरती; परिक्षेची तारीख जाहीर

काँग्रेस नेत्या खुशबू दिल्लीसाठी रवाना, भाजपत प्रवेश करण्याची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या