Top News

“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”

पुणे | काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं होतं. मात्र नंतर अशोक चव्हाण यांनी मी तसं म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

महाविकास आघाडीच्या सरकारने एक नवीन फेव्हीकॉल तयार केला आहे. चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, सकाळी भांडायचं आणि दुपारी गोड व्हायचं असं चाललंय, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”

“पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं”

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी- एकनाथ खडसे

“हिंमत असेल तर भाजपने हेडगेवार आणि सावरकरांच्या नावाने मते मागून दाखवावीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या