बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे | भाजप केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेचा गैरवापर करतंय. या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्याला केंद्र सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. तसेच देशावर आलेलं भाजपचं संकट परतवून लावावं लागेल, असं देखील ते म्हणाले ते होते. त्याला आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत. या यंत्रणेच्या वतीने उत्तर द्यायला मी काही त्यांचा अधिकारी नाही. सरकार पडण्याच्या विषयात सांगायचं तर सरकार पडणार नाही, परंतु सरकार पडणार नाही हे वारंवार का सांगावं लागतं हा महत्वाचा मुद्दा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पवार साहेब काय म्हणतात, यामुळे केंद्र सरकारचा पराभव होणार नाही. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं त्यावर केंद्रात सरकार कुणाचं ते ठरेल. सर्वसामान्य माणूस सुखी आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

साडेचार कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. त्यामुळे पवार साहेबांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या मनात आलं तरंच केंद्र सरकार पडेल, असं म्हणत त्यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“काश्मीर बिहारींना सोपवा, 15 दिवसांत सुधारुन दाखवू”

“येत्या 15 दिवसांत भाजपचे 6 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा ताजे दर

“नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, कोणी किती महसूल गोळा केला हे येईल समोर”

“कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत नाहीतर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More