बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की संध्याकाळी नाराजी दूर होईल”

नाशिक | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’च्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र यामुळे शिवसेना नेते संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

संजय राऊत नाराज हे मनाचे खेळ आहे. गेल्या तीन-चार महिन्यात आपण बघितलं की सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की संध्याकाळी नाराजी दूर होते, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरेंचं अभिनंदन केलं आहे. त्या खूप चांगलं काम करतील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही, असं मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र आता ठाकरे सगळंच घेताहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

मुंबईत 8 नगरसेवकांचे 60 झाले पाहिजेत… कामाला लागा- अजित पवार

मुख्यमंत्र्यांची आव्हाडांवर स्तुतिसुमनं, म्हणाले…’आता जवळ आल्यावर कळतंय ते कसे आहेत’

महत्वाच्या बातम्या- 

दिल्लीत हवं तसं घडलं नाही म्हणून भाजपने दंगल भडकवली- शरद पवार

…पण आता ठाकरे सगळंच घेत आहेत- चंद्रकांत पाटील

“26 वर्षे लोकांना हसवतोय, मात्र आता माझ्यावरच रडण्याची वेळ आलीय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More