पवारांनी केलेल्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार; म्हणतात…

पवारांनी केलेल्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार; म्हणतात…

मुंबई | मुख्यमंत्री स्वत: आमच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याचा तगादा लावत आहेत, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

शरद पवार साहेबांनी नेते भाजपात का जात आहेत याचा विचार करावा; उगीच सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असं पाटील म्हणाले आहेत.

तुम्ही वर्षानुवर्षे घराणेशाही जोपासली. बारामती लढवायला मुलगी लागते… मावळ लढायला नातू लागतो… तुम्हाला कुणालाही पुढे येऊच द्यायचं नाही, असा घणाघात पाटील यांनी केला.

दरम्यान, लोकांना पर्याय नव्हते म्हणून ते तुमच्यासोबत राहिले पण आता त्यांना पर्याय मिळतोय, म्हणून ते आमच्याकडे येत आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘हा’ माजी आमदार म्हणतो… मी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच!

-पतीच्या चौकशीमुळे चित्रा वाघ घाबरल्या होत्या- शरद पवार

-‘या’ महिला आमदार म्हणतात… शरद पवार हेच आमचे कप्तान!

-“राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत; साहेबांसाठी अंगठाच काय देहसुद्धा देऊ”

-काय उत्तम रित्या परतफेड केलीत; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आव्हाडांची चपराक

Google+ Linkedin