बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?- चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्यपालांनी साकीनाक्याच्या घटनेवरून दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून केली आहे. त्यावर उत्तराखंडमध्ये नेमकं काय चाललं आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या पत्रसंघर्षावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

एका सामान्य नागरिकालाही मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, महिला असुरक्षित आहेत. राज्यपालांनी अधिवेशन बोलवायचं असतं. मुख्यमंत्र्यांनी बोलवायचं नसतं. मुख्यमंत्र्यांनी विनंती पाठवायची असते, तर राज्यपालांनी त्यावर निर्णय करायचा असतो. राज्यपालांच्या सहीशिवाय अधिवेशन बोलावता किंवा संस्थगित करता येत नाही. मग राज्यपालांना एवढा अधिकारी नाही का?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

साकीनाक्याची घटना काय महाराष्ट्राला भूषणावह आहे का? महाराष्ट्रात लोकशाही लॉक करुन टाकली आहे. संपूर्ण दोन वर्षाच्या काळात दोन दिवसांपेक्षा अधिक काळ अधिवेशन होत नाही. प्रश्नांवर चर्चा होत नाही. प्रश्न विचारताय येत नाहीत. लोकशाहीचा खून होतोय, अघोषित आणीबाणी लागलेली आहे’, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केलीये.

दरम्यान, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पत्रसंघर्ष पाहायला मिळतोय

थोडक्यात बातम्या- 

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेेट!

भाजपच्या ‘त्या’ 12 निलंबित आमदारांना निवडणुक आयोगाचा मोठा दिलासा

“राज्यपालांच्या डोक्यावरील टोपी ही विद्वत्तेची, त्यांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे

महात्मा गांधी जयंतीला कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार काॅंग्रेसमध्ये प्रवेश

“पंडित नेहरू, वाजपेयींकडे जम्मू काश्मीरसाठी जे धोरण होतं ते मोदींकडे नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More