बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड- चंद्रकांत पाटील

मुंबई | काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रचार योजना आखल्याचं उघडकीस आलंय. संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संघर्ष करत असताना अशा प्रकारे देशाच्या विरोधात काम करणे निषेधार्ह आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

कोरोनाच्या प्रसाराबाबतही हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव करून निवडक टीका करण्याचे डावपेच काँग्रेसने आखल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक आणि निंदनीय आहे. या सर्व प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

काँग्रेसच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या या Toolkit मध्ये शतकानुशतकांपासून हिंदू समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक असणारा कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याची चर्चा करण्याची सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेसचेच कार्यकर्ते कोरोना काळात जनतेला मदत करत आहेत असे भासवण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये बेड आणि व्हेंटिलेटर सारखी इतर सामुग्री अडवून ठेवावी आणि केवळ काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरूनच ती उपलब्ध करून दिली जावी, अशी आणखी एक अमानूष सूचना या टूलकिटमध्ये आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का?”

“कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात?”

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या NSGच्या माजी प्रमुखांचं कोरोनाने निधन

आता घरच्या घरी कोरोना चाचणी करता येणार; जाणून घ्या ICMRचा महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More