बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार आल्यापासून हवेत गेलेले उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे”

पुणे | चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. वादळात मृत्यू झालेल्या प्रत्येकाला दोन लाख रुपयांची सरसकट मदत मोदीजींनी गुजरातमधून घोषित केली आहे. ही मदत केवळ गुजरातला केली हा प्रचार चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. यावर पंतप्रधानांच्या पाहणीवेळी सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे पंतप्रधानांना हवाई पाहणी करण्याचा गुप्तचर यंत्रणांचा सल्ला होता. महाराष्ट्रातील हवामान हे पंतप्रधानांच्या पाहणी दौऱ्यासाठी योग्य नव्हते म्हणून मोदी महाराष्ट्रात आले नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का?, असं फडणवीस म्हणाले. मला राजकीय बोलायचं नाही. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! डिस्चार्ज मिळण्याच्या काही तासांपूर्वी कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात; पिंपरीतील ‘भाईचा बड्डे’ थेट पोलीस कोठडीत

“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?”

मोठी बातमी! तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More